भारताची तक्रार करताना पाकिस्तानने ‘United Nations’ ऐवजी ‘UNO गेम’ला केलं टॅग

भारताची तक्रार करताना पाकिस्तानने ‘United Nations’ ऐवजी ‘UNO गेम’ला केलं टॅग

जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द झाल्यानंतर पाकिस्तानने हालचाल सुरू केली आहे. या निर्णयाविरूद्ध पाकिस्तान दबाव आणण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत आहे. यातचं पाकिस्तानचा एक विचित्र प्रकार समोर आला आहे. पाकिस्तानच्या माजी मंत्री मलिक यांनी भारतावर टीका करत असताना युनायडेट नेशन्सचे ट्विटर हॅण्डल टॅग करण्याऐवजी उनो गेमचे ट्विटर हॅण्डल टॅग केले आहे.

पाकिस्तानचा विचित्रपणा

मोदी सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यात आलं आहे. त्यानंतर पाकिस्तानने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. पाकिस्तान सिनेटचे सदस्य रेहमान मलिक
यांनी भारतावर टीका करणारे ट्विट करताना विचित्र प्रकार केला आहे.

संयुक्त राष्ट्रांचे म्हणजेच युनायडेट नेशन्सचे ट्विटर हॅण्डल टॅग करण्याऐवजी उनो गेमचे ट्विटर हॅण्डल टॅग केले आहे. यावरून त्यांना सोशल मिडीयावर ट्रोल करण्यात आलं आहे. त्यांच्या या ट्विटमुळे भारतावर टीका होण्याऐवजी त्यांच्यावरचं टीका झाली आहे.

श्रीनगरमधील परिस्थितीवर भाष्य करणारे मोदींचे ट्विट त्यांनी एएनआयच्या ट्विटला कोट करण्यात आल्याने हा प्रकार समोर आला आहे. मलिक यांनी पंतप्रधान मोदी आणि उनो गेमच्या ट्विटर अकाउंटला टॅग केले. यामुळे त्यांचा चांगलाच हशा झाला आहे.

 

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version