पुण्यात मराठा क्रांती मोर्चाकडून सदावर्तेंना विरोध

पुण्यात मराठा क्रांती मोर्चाकडून सदावर्तेंना विरोध

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांची बदनामी केल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सदावर्तेंना हजर राहण्यासाठी पोलिसांनी नोटीस बजावली होती. त्यानुसार गुणरत्न सदावर्ते पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी हजर झाले आहेत.

गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ऑक्टोबर २०२०मध्ये एक गुन्हा दाखल आहे. छत्रपती संभाजी राजे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी एका व्यक्तीने सदावर्तेंविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात पुण्यात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

गुणरत्न सदावर्ते गुरुवारी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात हजर झाले आणि काही वेळातच मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर जमून निषेधाच्या घोषणा दिल्या. छत्रपती यांच्या घराण्याबाबत आक्षेपार्ह विधान करून गुणरत्न सदावर्ते यांनी छत्रपती यांच्या गादीचा अपमान केला आहे. त्यांनी मराठा आरक्षणाबाबत जे राजकारण केले त्याचा मराठा क्रांती मोर्चाने निषेध केला.

या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी एक मराठा, लाख मराठा घोषणा दिल्या. कार्यकर्त्यांनी पोलिसांना दडपशाही केली असून आम्ही लोकशाही मार्गाने निषेध व्यक्त करत होतो. आमचे आंदोलन शांततेने सुरु असताना पोलिसांनी वातावरण तापवले, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केला. यावेळी, आंदोलन कार्य़कर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version