Online Liquor Sale : मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! आता ऑनलाइन बुक करता येणार दारू, कुठे सुरू झाली सुविधा?

मोबाईल ॲप सुरू केले असून, त्याच्या माध्यमातून ग्राहकांना दारूची ऑनलाइन ऑर्डर देता येणार आहे.
Online Liquor Sale : मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! आता ऑनलाइन बुक करता येणार दारू, कुठे सुरू झाली सुविधा?

तंत्रज्ञानाचा वापर आता मद्यविक्री व्यवस्थेतही मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. ग्राहकांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि मद्यविक्रीतील अनियमितता रोखण्यासाठी तमिळनाडू सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सरकारी मद्यविक्री संस्था तमिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन (TASMAC) ने विशेष मोबाईल ॲप सुरू केले असून, त्याच्या माध्यमातून ग्राहकांना दारूची ऑनलाइन ऑर्डर देता येणार आहे.

या नव्या प्रणालीमुळे ग्राहकांना दुकानात जाऊन ब्रँड उपलब्ध आहे की नाही, किंमत किती आहे किंवा स्टॉक संपला आहे का, यासाठी वेळ घालवावा लागणार नाही. मोबाईल ॲपवरच ही सर्व माहिती उपलब्ध होणार असून, ऑनलाइन पेमेंट करून ऑर्डर निश्चित करता येणार आहे.

एका क्लिकवर मिळणार संपूर्ण माहिती

राज्यातील 4038 TASMAC विक्री केंद्रांना या डिजिटल व्यवस्थेशी जोडण्यात येणार आहे. ग्राहक ॲपच्या मदतीने आपल्या परिसरातील अधिकृत दुकान शोधू शकतील. त्याचबरोबर विविध मद्य ब्रँड्सची अधिकृत किंमत, उपलब्ध स्टॉक आणि संबंधित दुकानाची माहितीही पाहता येणार आहे. यामुळे ग्राहकांना दुकानात जाऊन चौकशी करण्याची गरज भासणार नाही आणि खरेदी प्रक्रिया अधिक वेगवान होईल. ऑनलाइन पेमेंट, QR Code आणि थेट डिलिव्हरी काउंटरवरून उचल ग्राहकाने इच्छित उत्पादन निवडून ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर त्याच्या मोबाईलवर QR Code उपलब्ध होईल. संबंधित TASMAC दुकानात हा QR Code दाखवताच ऑर्डर केलेले मद्य मिळेल. त्यामुळे दुकानांमधील अनावश्यक गर्दी कमी होण्यास मदत होईल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

एमआरपीपेक्षा जास्त दर आकारण्याला आळा

दारू विक्रीदरम्यान ग्राहकांकडून अधिक पैसे आकारल्याच्या तक्रारी अनेकदा समोर येत होत्या. नवीन ॲपमध्ये प्रत्येक उत्पादनाची अधिकृत किंमत स्पष्टपणे दर्शविण्यात येणार असल्याने अतिरिक्त पैसे घेण्याच्या प्रकारांना मोठ्या प्रमाणात आळा बसेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.यापूर्वी एमआरपीपेक्षा अधिक रक्कम घेतल्याप्रकरणी TASMAC च्या काही कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर विक्री प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी हे डिजिटल पाऊल उचलण्यात आले आहे.

डिजिटल मद्यविक्रीकडे आणखी एक पाऊल

तमिळनाडूपूर्वी पश्चिम बंगालमध्ये ई-रिटेल प्लॅटफॉर्मद्वारे नोंदणीकृत ग्राहकांना ऑनलाइन मद्य बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे. ओडिशामध्येही परवानाधारक विक्रेत्यांमार्फत होम डिलिव्हरीची व्यवस्था सुरू आहे. आता तमिळनाडूनेही मोबाईल ॲपच्या माध्यमातून मद्यविक्रीची सुविधा सुरू करून डिजिटल सेवांच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

या निर्णयामुळे ग्राहकांना अधिक पारदर्शक सेवा मिळण्यासोबतच किंमत, उपलब्धता आणि खरेदी प्रक्रिया अधिक सुलभ होणार असल्याचे मानले जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version