आता काँग्रेसच्या सरपंचाने नाचवल्या डान्सर्स

आता काँग्रेसच्या सरपंचाने नाचवल्या डान्सर्स

  बीडमधील सपना चौधरीचा डान्स वादाच्या भोवऱ्यात असतानाच आता नवा कारनामा पुढे आला आहे. राज्याचे युवा आण क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या मतदार संघात काँग्रेस पक्षाच्या सरपंचाने नाचगाणी कार्यक्रमाचे आयोजन करून डान्सर्स नाचवल्या आहेत. त्यामुळे माविआच्या नेत्यांची संवेदना कुठे हरवली आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काँग्रेसच्या सरपंचाने नाचवल्या डान्सर्स नाचवल्यामुळे राज्य संकटात असल्याचा राजकीय पक्षांना विसर पडल्याचे चित्र दिसत आहे.

  मंत्री धनंजय मुंडे यांनी सपना चौधरीचा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि आता राज्याचे युवा आण क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या मतदार संघात काँग्रेस पक्षाच्या सरपंचाने कोथूलाना गावात नाचगाणी कार्यक्रमाचे आयोजन केले. राज्यमंत्री सुनील केदार यांच्या सावनेर मतदार संघातील कोठुलाना गावात काँग्रेसचे सरपंच हरीश चौधरी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दिवाळीत मंडई नावाचा सांस्कृतिक कार्यक्रम नागपूर आणि विदर्भातील काही जिल्ह्यात आयोजिय केला जातो. मात्र मंडईच्या नावाने अश्लील नृत्य नृत्यगनेकडून केले जात होते. नृत्यांगना तोकडे कपडे घालून नाचताना अश्लील हातवारे देखील करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

  युवा आण क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या मतदार संघात काँग्रेस पक्षाच्या सरपंचाने नाचगाणी कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे माविआच्या नेत्यांची संवेदना कुठे हरवली आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version