Nepal Dolakha Avalanche: यालुंग री पर्वतावर हिमस्खलनाची थरकाप उडवणारी दुर्घटना; तीन मृत, चार बेपत्ता

एक हेलिकॉप्टर घटनास्थळी उतरवण्यात आले असून मंगळवार सकाळपासून पूर्ण प्रमाणावर शोध आणि बचाव मोहिम सुरू केली जाणार आहे. बचाव पथके आणि स्थानिक स्वयंसेवकांनी परिसरात तंबू आणि तात्पुरते तळ उभारले आहेत.
Nepal Dolakha Avalanche: यालुंग री पर्वतावर हिमस्खलनाची थरकाप उडवणारी दुर्घटना; तीन मृत, चार बेपत्ता
 

काठमांडू (नेपाळ): नेपाळमधील डोलखा जिल्ह्यात सोमवारी सकाळी झालेल्या भीषण हिमस्खलनात किमान तीन जणांचा मृत्यू झाला असून चार परदेशी पर्वतारोहक बेपत्ता झाले आहेत. ही दुर्घटना यालुंग री पर्वतावर (Yalung Ri Peak) 5,630 मीटर म्हणजेच सुमारे 18,470 फूट उंचीवर घडली. स्थानिक पोलिस अधिकारी ज्ञानकुमार महतो यांनी वृत्तसंस्था एएफपीला दिलेल्या माहितीनुसार, 12 पर्वतारोहकांचा गट या हिमस्खलनाच्या तडाख्यात सापडला. हिमस्खलन म्हणजे काय हे सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर हिमस्खलन (Avalanche) म्हणजे पर्वतीय भागातील उतारावर साठलेली बर्फाची मोठी मात्रा अचानक सैल होऊन अतिवेगाने खाली घसरणे. हा प्रकार सहसा तेव्हा घडतो जेव्हा बर्फाच्या थरांमध्ये अचानक अस्थिरता निर्माण होते आणि बर्फाचे प्रचंड प्रमाण खालच्या भागाकडे वाहून जाते.

स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, मृतांमध्ये दोन नेपाळी नागरिक आणि एक परदेशी पर्वतारोहक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र अद्याप मृत आणि बेपत्ता व्यक्तींची राष्ट्रीयता अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. काही आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या अहवालानुसार, सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे, ज्यात एक अमेरिकन, एक इटालियन आणि एक कॅनेडियन पर्वतारोहक असल्याचे म्हटले आहे. डोलखा जिल्ह्यातील प्रतिकूल हवामानामुळे बचावकार्याला सुरुवातीला विलंब झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तथापि, एक हेलिकॉप्टर घटनास्थळी उतरवण्यात आले असून मंगळवार सकाळपासून पूर्ण प्रमाणावर शोध आणि बचाव मोहिम सुरू केली जाणार आहे. बचाव पथके आणि स्थानिक स्वयंसेवकांनी परिसरात तंबू आणि तात्पुरते तळ उभारले आहेत.

हेही वाचा: Cyclone Alert: महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचं सावट? नव्या चक्रीवादळाने टेन्शन वाढलं; पुढील 48 तास अतिशय महत्त्वाचे

नेपाळ हे जगातील सर्वोच्च पर्वत माउंट एव्हरेस्टसह दहा सर्वात उंच शिखरांपैकी आठ शिखरांचे घर आहे. त्यामुळे दरवर्षी येथे शेकडो पर्वतारोहक आणि ट्रेकर्स आकर्षित होतात. मात्र, हिवाळ्यातील अत्यंत थंड हवामान आणि बर्फवृष्टीमुळे अशा मोहिमा अधिक धोकादायक ठरतात. गेल्या आठवड्यात आलेल्या ‘मोन्था चक्रीवादळामुळे’ नेपाळभरात जोरदार पाऊस आणि हिमवृष्टी झाली होती. त्यामुळे अनेक हिमालयीन ट्रेकिंग मार्गांवर पर्यटक अडकले होते. पर्यटन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम नेपाळातील एका दुर्गम शिखरावर चढाई करताना दोन इटालियन पर्वतारोहकही बेपत्ता झाले आहेत.

सध्या, नेपाळ सरकारने पर्वतारोहण संस्थांना आणि स्थानिक मार्गदर्शकांना सावधगिरीचे निर्देश दिले आहेत. हवामान सुधारल्यानंतर बचाव कार्य वेगाने पुढे नेले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेने पुन्हा एकदा हिमालयातील हवामानाच्या अनिश्चिततेचा आणि पर्वतारोहणाच्या जोखमीचा दाखला दिला आहे.

हेही वाचा: Rohit Arya Case: पवईतील आर. ए. स्टुडिओ प्रकरणात नवे उघड: रोहित आर्याशी संपर्कात असलेले मराठी कलाकार चौकशीच्या रडारवर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version