समीर वानखेडेबाबत नवाब मलिकांचा गौप्यस्फोट

समीर वानखेडेबाबत नवाब मलिकांचा गौप्यस्फोट

  क्रूझवरील ड्रग्जपार्टीप्रकरणी आर्यन खान एनसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. या ड्रग्जप्रकरणी राजकारण चांगलेच तापले असून दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नवा गौप्यस्फोट केला आहे. नवाब मलिकांनी दोन ट्वीट करत समीर वानखेडे यांच्या घोटाळ्याचे पुरावे सादर केले आहेत.

  नवाब मलिकांनी समीर वानखेडे यांच्या लग्नातला फोटो शेअर करत ‘पहचान कौन’ असे लिहिले. तसेच मलिकांनी वानखेडेंचे जातप्रमाणपत्रसुद्धा शेअर केले आणि लिहिले ‘यहाँसे शुरु हुआ फर्जीवाडा’. वानखेडेंच्या जातप्रमाणपत्रात समीर दाऊद वानखेडे असा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे वानखेडेंनी गैरप्रकाराने नोकरी मिळवली असल्याचा आरोप नवाब मलिकांनी वानखेडेंवर केला आहे.

 भाजपच्या काही नेत्यांच्या सांगण्यावरून वानखेडे बॉलिवडूला त्रास देत असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. राज्यातील सत्ताधारी पक्षाला बदनाम करण्यासाठी हे सर्व सुरू असल्याचे ते म्हणाले. एखाद्या कारवाईच्या आधी वानखेडे हेच मीडियाला माहिती देत असतात. वानखेडे हव्या त्या बातम्या देत लोकांची बदनामी करून त्यांच्याकडून वसुली करतात. त्यामुळे त्यांची नोकरी घालवून त्यांना तुरूंगात टाकल्याशिवाय थांबणार नसल्याचा इशारा नवाब मलिकांनी दिला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version