बुधवारपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत असताना भाजप नेते मोहित कंबोज सध्या राष्ट्रवादीवर निशाणा साधून आहेत. काल तीन ट्विटमधून इशारा दिल्यानंतर आता आज त्यांनी पुन्हा एकदा एक ट्विट केले आहे. हर हर महादेव अब तांडव होगा असे ट्विट केले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची आजच चौकशी होण्याची शक्यता आहे.
सध्या राज्यात ईडीच्या कारवाया मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत. विरोधीपक्षातील नेते त्यांच्या निशाण्यावर आहेत. नुकतेच शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना ईडीने अटक केली. त्यानंतर नेक्स्ट कोण? याचे उत्तर मोहित कंबोज यांनी भविष्यवाणी करणाऱ्या ट्विटमधून दिले आहे. कंबोज यांचे हे ट्विट राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडवणारे आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन मोठे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे या अगोदरच ईडीच्या कारवाईने तुरुंगात आहेत. त्यातच आता या दोन नेत्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा नेता लवकरच तुरुंगात जाणार अशा आशयाचे ट्विट करत मोहित कंबोज यांनी केले आहे. राष्ट्रवादीवर ट्विटरद्वारे हल्लाबोल केला आहे. काल केलेल्या ट्विटमध्ये माझे हे ट्विट सेव्ह करुन ठेवा, अनिल देखमुख, नवाब मलिकांपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची बारी आहे. लवकरच हा नेता मलिक, देशमुखांच्या भेटीला जाणार आहे. तेव्हा जेलवारीसाठी तयार राहा, असे सूचक इशारा देणारे ट्विट मोहित कंबोज यांनी केले. त्यांच्या या ट्विटने जेलमध्ये जाणारा राष्ट्रवादीचा तिसरा नेता कोण असा प्रश्न चर्चेत आला आहे. तर दुसरीकडे पुढे घडणाऱ्या घडामोडी कंबोज यांना आधीच कशा माहिती होतात असा प्रश्न विचारला जात आहे.
https://twitter.com/mohitbharatiya_/status/1559567277422362624?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1559567277422362624%7Ctwgr%5E5a3ffaa54e5e0ff6d544fda375a2c31e6de7aab6%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.deshdoot.com%2Fpolitical-news%2Fncps-big-leader-will-go-in-jail-soon-mohit-kamboj-tweet-irrigation-scam-case
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.