पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. बापट हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
तसेच त्यांच्यांवर डॉक्टरांनी उपचार सुरु केले आहेत. पुणे येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिनानाथ रुग्णालयाकडून खासदार गिरीश बापट यांच्या प्रकृतीसंदर्भात बुलेटीन काढले. त्यात म्हटले आहे की, खासदार बापट यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेऊन आहेत.
कसबा विधानसभेच्या अटीतटीच्या पोटनिवडणुकीसाठी खासदार गिरीश बापट यांनी व्हिलचेअरवरून ऑक्सिजन सपोर्टवर येऊन सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास मतदान केले होते. भाजपच्या प्रचारादरम्यान बापट यांनी आजारी असून स्वतः मैदानात उतरून पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला होता. यानंतर राष्ट्रीय अधिकार बजावण्यासाठी बापट हे मतदानासाठी पोहचले. कसबा निवडणूक भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनवली होती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.