मोदींच्या हस्ते मुंबईत मेट्रोच्या 3 मार्गांची पायाभरणी

मोदींच्या हस्ते मुंबईत मेट्रोच्या 3 मार्गांची पायाभरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये दाखल झाले. यावेळी विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नवे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर मान्यवरांनी त्यांचं स्वागत केलं.

पंतप्रधान मोदी आज मुंबई आणि औरंगाबादचा दौरा करणार आहेत.

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विकासकामांचं भूमिपूजन तसंच उद्घाटन ते करणार आहेत.

प्रथम विलेपार्ल्यातील लोकमान्य सेवा संघाच्या गणपतीचं दर्शन मोदींनी घेतलं.

वांद्रे-कुर्ला संकुलात मोदींच्या हस्ते मेट्रोमार्गाचं भूमिपूजन झालं.

मेट्रोच्या 10, 11, 12 या तीन मार्गांनी मेट्रोचं जाळं 42 किलोमीटरने वाढणार आहे.

मेक इन इंडिया अंतर्गत बनवलेल्या मेट्रो कोचची मोदींनी पाहणी केली.

या कामाचं मोदींनी कौतुकही केलं.

मेट्रो 10 गायमुख ते मीरा रोड हा 9.2 किलोमीटरचा मार्ग होणार आहे.

मेट्रो 11 हा वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 12.7 किलोमीटरचा मार्ग होणार आहे.

मेट्रो 12 हा कल्याण ते तळोजा हा 20.7 किलोमीटरचा मार्गदेखील होणार आहे.

या कार्यक्रमाला मोदींसमावेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version