एसटी आंदोलकांच्या संपात आमदार रवी राणा यांची उडी

एसटी आंदोलकांच्या संपात आमदार रवी राणा यांची उडी

राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. आता एसटी आंदोलकांच्या संपात आमदार रवी राणा यांनी उडी मारली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी पाठिंबा दिला आहे. अमरावतीमध्ये नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या नेतृत्वात एसटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या मोर्चामध्ये हजारो एसटी महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर आपल्या मागण्या मांडत एसटी कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. तसेच यावेळी तेथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version