आमदार रवी राणा यांनी उभारला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

आमदार रवी राणा यांनी उभारला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

आमदार रवी राणा यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा उभारला आहे. आमदार रवी राणा यांनी कार्यकर्त्यांसह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करत महाआरती, पूजा केली. दरम्यान अमरावतीच्या महापौरांनी बैठक घेत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अधिकृत परवानगी देण्याची मागणी आमदार रवी यांनी केली आहे.

आमदार रवी राणा यांनी अमरावतीमध्ये राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा उभारल्या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, अमरावतीमध्ये ५५ कोटी रुपये खर्च करून राजापीठ उड्डाणपूल उभारण्यात आला. तसेच या उड्डाणपूलावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याची अमरावती करांची मागणी होती. त्यामुळे आज राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. दरम्यान महाराजांच्या पुतळ्याला अधिकृत परवानगी देण्याची मागणी आमदार रवी यांनी अमरावतीच्या महापौरांकडे केली आहे. अमरावतीकरांची इच्छा पूर्ण झाली आहे. तसे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन झाले हे आमचे सौभाग्य आहे.’ असे ते म्हणाले. त्यामुळे ज्या मावळ्यांनी हा पुतळा उभारला तसेच प्रशासनाने सहकार्य केल्याप्रकरणी रवी राणा यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version