रशिया-युक्रेन युद्धाचा आज दहावा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनवर तीव्र लढाई सुरूच असून रशियन सैन्याकडून युक्रेनवर सतत बॉम्बहल्ले सुरू आहेत. दरम्यान, रशियन सैन्याने युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्या निवासस्थानाजवळ क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. त्यामुळे रशियाकडून राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्या हत्येचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप युक्रेनने केला आहे.
राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्या निवासस्थानाजवळ झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यावर झेलेन्स्की यांनी भाष्य केले आहे. रशियाकडून आपल्या हत्येचा प्रयत्न झाला असल्याचे झेलेन्स्की म्हणाले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रशिया-युक्रेन युद्धामध्ये तीन वेळा झेलेन्स्की यांच्या हत्येचा प्रयत्न झाला आहे.
युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की हे देश सोडून गेले असल्याचा दावा रशियाने केला आहे. मात्र, रशियाचा हा दावा युक्रेनने फेटाळून लावला आहे. झेलेन्स्की यांनी देश सोडला नसून ते युक्रेनमध्येच असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.