आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

रेल्वेच्या विविध कामासाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर ब्लॉक ठेवण्यात आला आहे. मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे, पश्चिम रेल्वे  या तिन्ही मार्गावर हा ब्लॉक असणार आहे. ब्लॉक दरम्यान जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळविण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वे :

माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे हा ब्लॉक सकाळी 9.52 ते दुपारी 2.42 पर्यंत मेगाब्लॉक आहे. तर  डाऊन जलद मार्गावर गा ब्लॉक आहे. या ब्लॉक दरम्यान जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत.  मेगाब्लॉकच्या कामांमुळे सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत लोकल फेऱ्या 15 ते 20मि. उशिराने धावतील.

हार्बर रेल्वे :

या मार्गावरील कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेतला जाईल. सकाळी 11.10 ते दुपारी 3.40  पर्यंत हा ब्लॉक असून अप आणि डाऊन मर्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.  या ब्लॉक दरम्यान कुर्ला ते वाशीदरम्यानची वाहतूक बंद करण्यात  आली आहे . सीएसएमटी-कुर्ला आणि वाशी, पनवेल मार्गावर विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वे :

चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान ब्लॉक घेण्यात येईल  हा ब्लॉच  सकाळी 10.35ते दुपारी3.35  पर्यंत ब्लॉक सुरू राहील. हा ब्लॉक  अप आणि डाऊन जलद मार्गावर असणार आहे. जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. परिणामी काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल उशिराने धावणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version