Mauni Amavasya 2026: मौनी अमास्येला करा ‘मौन’ साधना; जाणून घ्या तिथी, महत्त्व आणि पितरांच्या शांतीसाठी प्रभावी उपाय

जर तुमच्या कुटुंबात सतत आजारपण, आर्थिक चणचण किंवा कामात अडथळे येत असतील, तर पितृदोष कारणीभूत असू शकतो. मौनी अमावस्येला पितरांच्या शांतीसाठी त्रिपिंडी श्राद्ध करणे अत्यंत फलदायी ठरते.
Mauni Amavasya 2026: मौनी अमास्येला करा ‘मौन’ साधना; जाणून घ्या तिथी, महत्त्व आणि पितरांच्या शांतीसाठी प्रभावी उपाय

Mauni Amavasya 2026 Pitra Upay : हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष स्थान आहे, परंतु त्यातही मौनी अमावस्या (पौष अमावस्या असेही म्हटले जाते) सर्वात महत्त्वाची मानली जाते. ही अमावस्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि पितरांच्या आशीर्वादासाठी एक दुर्मिळ संधी घेऊन येते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान, दानधर्म आणि विशेषतः 'मौन' पाळल्याने मनाची शुद्धी होते आणि पापांचा नाश होतो, अशी धार्मिक मान्यता आहे.

मौनी अमावस्या 2026: तारीख आणि शुभ मुहूर्त
यंदा मौनी अमावस्या 18 जानेवारी 2026, रविवारी साजरी केली जाणार आहे. पंचांगानुसार, अमावस्या तिथी 18 जानेवारी रोजी मध्यरात्री 12:03 AM वाजता सुरू होईल आणि 19 जानेवारी रोजी पहाटे 01:21 AM वाजेपर्यंत असेल. 'उदय तिथी' ग्राह्य धरली जात असल्याने, स्नानाचे आणि दानाचे सर्व विधी 18 जानेवारी रोजीच पार पडतील. या दिवशी सकाळी 05:00 ते 09:00 ही वेळ तर्पण आणि पितृपूजेसाठी अत्यंत शुभ मानली जाते.

पितृदोषातून मुक्तीसाठी 'तर्पण' आणि 'श्राद्ध' विधी
जर तुमच्या कुटुंबात सतत आजारपण, आर्थिक चणचण किंवा कामात अडथळे येत असतील, तर पितृदोष कारणीभूत असू शकतो. मौनी अमावस्येला पितरांच्या शांतीसाठी त्रिपिंडी श्राद्ध करणे अत्यंत फलदायी ठरते. पवित्र तीर्थक्षेत्री (उदा. गया किंवा हरिद्वार) श्राद्ध विधी केल्याने तीन पिढ्यांच्या पूर्वजांना मोक्ष मिळतो. घरी राहून तर्पण करायचे असल्यास, एका भांड्यात पाणी घेऊन त्यात काळे तीळ, तांदूळ आणि 'कुश' मिसळून दक्षिण दिशेकडे तोंड करून पितरांना अर्पण करावे. यामुळे नाराज पितर प्रसन्न होऊन सुख-समृद्धीचा आशीर्वाद देतात.

हेही वाचा – Maghi Ganesh Jayanti 2026 : गणपती बाप्पाच्या जन्मोत्सवाचा शुभ मुहूर्त; तिथी, धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व

दानाचा महिमा आणि 'पंचबली' कर्म
मौनी अमावस्येला दानाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी केवळ अन्नदानच नाही, तर पितरांच्या नावाने पांढऱ्या वस्तूंचे (उदा. पांढरे कापड, तीळ, दूध, पांढरी मिठाई) दान करावे. विशेषतः 'पंचबली' कर्म करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते; ज्यामध्ये गाय, कावळा, मुंग्या, कुत्रा आणि ब्राह्मणांना अन्नाचा भाग दिला जातो. हा विधी केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि रखडलेली कामे मार्गी लागतात.

अंधारातून प्रकाशाकडे: दीपदान आणि पिंपळ पूजा
पितरांचा मार्ग सुकर करण्यासाठी मौनी अमावस्येच्या संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा लावावा. सूर्यास्तानंतर जेव्हा पितर पितृलोकात परततात, तेव्हा हा प्रकाश त्यांना आनंद देतो. तसेच, पिंपळाच्या झाडाला 'विष्णू' आणि पितरांचे निवासस्थान मानले जाते. या दिवशी पिंपळाला दूध आणि गंगाजल अर्पण करून सात प्रदक्षिणा घातल्यास आणि तिथे दिवा लावल्यास पितृदोष शांत होतो. मनःशांतीसाठी या दिवशी 'ओम पितृभ्यो नमः' या मंत्राचा जप आणि गीतेच्या 8 व्या अध्यायाचे पठण करणे फायदेशीर ठरते.

हेही वाचा – Makar Sankranti 2026 : मकर संक्रांतीला बाळाला सजवा घरच्या घरी बनवलेल्या हलव्याच्या दागिन्यांनी; वापरा या सोप्या टिप्स 

(Disclaimer : ही बातमी ज्योतिषशास्त्रीय आणि धार्मिक सामान्य माहितीवर आधारित आहे. जय महाराष्ट्र याचा दावा करत नाही किंवा हमी देत नाही.)

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version