बिहारमध्ये भीषण स्फोट; सात मृत्यू, अनेक जखमी

बिहारमध्ये भीषण स्फोट; सात मृत्यू, अनेक जखमी

बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात पहाटे भीषण स्फोट झाला आहे. तातारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीषण स्फोट झाल्याने सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. फटाके बनवताना स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

भागलपूर जिल्ह्यात तातारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्फोट होताच पोलीस आणि अग्निशमक दल घटनास्थळी पोहचले. या स्फोटात सात जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच स्फोटात दुर्गटनाग्रस्त घराजवळीत २-३ घरांचे नुकसान झाले आहे. कच्चे बांधकाम असल्याने बैठी घरे उद्ध्वस्त झाली आहेत. पडलेल्या ढिगाऱ्यातून सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. तसेच या दुर्घटनेचा अधिक तपास सुरू असल्याचे भागलपूरचे जिल्हाधिकारी सुब्रत कुमार सेन यांनी सांगितले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version