हुतात्मा जवान रोमित चव्हाण अनंतात विलीन

हुतात्मा जवान रोमित चव्हाण अनंतात विलीन

जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील झेनपुरा येथे दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ रोजी दहशतवाद्यांच्या शोध मोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत सांगलीतील वाळवा तालुक्यातील शिगाव येथील रोमित तानाजी चव्हाण यांना वीरमरण आले. वयाच्या २३व्या वर्षी रोमित चव्हाण शहीद झाले आहेत.

शहीद रोमित चव्हाण यांचे पार्थिव आज सकाळी ६ वा. त्यांच्या मूळ गावी शिगाव येथील राहत्या घरी आणण्यात आले. वारणा नदीकाठ स्मशानभूमीत शहीद रोमित चव्हाण यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

पालकमंत्री जयंत पाटील यांनी दु:ख व्यक्त करत म्हटले की, पाच वर्षापूर्वी शहीद रोमित चव्हाण सैन्यात सामील झाला. दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देताना रोमित चव्हाण यांना वीरमरण आले. एक अतिशय कर्तबगार असा जवान शहीद झाला. आम्हा सर्वांना रोमित यांचा सदैव अभिमान राहिल, तसेच त्यांचे योगदान कधीही न विसरणारे आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version