मनसैनिकांना पोलिसांनी रोखले

मनसैनिकांना पोलिसांनी रोखले

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून मशिदींवरील भोंग्यांविरोधातील आंदोलनाचा पाठपुरावा केला जात आहे. राज ठाकरे यांनी गुरुवारी एक पत्रक प्रसिद्ध केले होते. हे पत्रक घरोघरी पोहोचवावे, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले होते. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मुंबईच्या चेंबूर परिसरातील मनसैनिकांनी घरोघरी जाऊन हे पत्रक वाटायला सुरुवात केली होती. तसेच मनसैनिकांकडून चेंबूरमध्ये राज ठाकरे यांच्या पत्रकाचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. मात्र, पोलिसांनी या मनसैनिकांना तातडीने ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी मनसैनिकांना नक्की का ताब्यात घेतले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, आता त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार का, हे पाहावे लागेल. तर दुसरीकडे पोलिसांच्या या पवित्र्यामुळे राज्याच्या इतर भागांमध्येही मनसैनिक राज ठाकरे यांचे पत्रक वाटायाला गेल्यास त्यांच्यावर अशाप्रकारची कारवाई होऊ शकते. त्यामुळे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना याविरोधात आक्रमक होणार का, हे पाहावे लागेल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version