बुलढाणा जिल्ह्यातील विदर्भाची पंढरी असलेल्या संतनगरी शेगावात येत्या १३ फेब्रुवारी रोजी श्री संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. यासाठी राज्यभरातून ठीक ठिकाणाहून दिंड्यांचे शेगावात आगमन व्हायला सुरुवात झाली आहे. शेकडो मैल अंतर कापत या पायी दिंड्या शेगाव कडे आगेकूच करताना पाहायला मिळत आहे.
माघ वद्य सप्तमी म्हणजे २३ फेब्रुवारी १८७८ रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण होते, अशी दंतकथा आहे. बिरुदुराजू रामराजू नावाच्या एका लेखकाने ‘आंध्रा योगुलु’ नावाच्या पुस्तकात गजानन महाराज तेलंगी ब्राह्मण असल्याचे लिहिले आहे. ‘गण गण गणात बोते’चा गजर, अभिषेक, पालखी, पारायण अशा धार्मिक वातावरणात श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात येतो. यंदाच्या साली देखील परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता ‘श्रींचा प्रगटदिनोत्सव संस्थानच्या धार्मिक प्रथा व परंपरेनुसार मर्यादीत स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे.
गजानन महाराजांना पंढरीलाच समाधी घेण्याचा मानस होता. मात्र, विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले. ऋषिपंचमीला सूर्याची पहिली किरणे जमिनीवर पोहोचली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलीन केले. १९६७ पासून गजानन महाराज पालखी माध्यमातून गजानन महाराज खेड्या- पाड्यापर्यंत पोहोचले. विठ्ठलाच्या आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होते. देहू ,आळंदीनंतर याच पालखीला सर्वाधिक महत्त्व आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.