ममता बॅनर्जी-शरद पवार भेट

ममता बॅनर्जी-शरद पवार भेट

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची नवी दिल्लीत भेट घेतली आहे. ममता बॅनर्जी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. याच, पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी पवारांची भेट घेतली. बुधवारी ममता बॅनर्जी यांनी बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे मंगळवारी ममता बॅनर्जी यांनी पवारांची भेट घेत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत चर्चा केली आहे.

ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षांना पत्र लिहून एकत्र येण्याचे आवाहन केले होते. तसेच ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस पवारांचा नकार

देशाच्या राष्ट्रपतींच्या नियुक्तीसाठी १८ जुलै रोजी निवडणुका होणार आहेत. तर, राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा जोर धरत आहे. मात्र, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शरद पवारांनी नकार दर्शवला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तसेच तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या बैठकीत शरद पवारांनी हे मत मांडलं आहे. पवारांच्या या भूमिकेमुळे पुन्हा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version