फडणवीसांच्या आरोपावर मलिक कुटुंबाचा आक्षेप

फडणवीसांच्या आरोपावर मलिक कुटुंबाचा आक्षेप

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दाऊदचे नाते संबंध असलेल्या व्यक्तीला वक्फ बोर्डावर घेतल्याचे सांगत खळबळ उडवली आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. लांबे यांच्या नियुक्तीचा संबंध अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याशी आहे का? असा सवाल केला आहे. त्यावर मलिक कुटुंबाने त्यावर आक्षेप नोंदवला आहे.

नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक हिने या मुद्द्यावर ट्विट केले की, ‘अर्धसत्य नेहमी पूर्ण खोटं असते. डॉ. लांबे यांची वक्फ बोर्डावर नियुक्ती फडणवीसांच्या काळात झाली. डॉ. लांबे यांची नियुक्ती १३ सप्टेंबर २०१९ ला झाली. नोव्हेंबर २०१९ साली महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. नवाब मलिक यांना अल्पसंख्याक मंत्रालय आणि वक्फ बोर्डाची जबाबदारी जानेवारी २०२०मध्ये मिळाली आहे. जर कोणाला असं वाटत असेल की, नबाब मलिक न्यायालयीन कोठडीत असल्याने त्यांच्याबद्दल खोटे बोलून ते निसटून जातील. तर, आम्ही अशा दाव्यातील तथ्य तपासण्यासाठी आहोत. आम्हाला कोणतीही भीती न बाळगता लढायला शिकवले आहे.’

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version