सध्या सर्वत्र थ्रेडसचा बोलबाला आहे. मग तुम्ही अजून ‘इंस्टाग्राम थ्रेडस’ वापरलं नाही? तर कसं सुरु कराल अकाउंट? जाणून घ्या :
मेटा कंपनीने थ्रेड्स नावाचे एक नवीन समाज माध्यम सुरु केले आहे. हे मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरला पर्याय असल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे या अॅपने काही तासांतंच कोट्यवधी युजर्सच्या फोनमध्ये जागा मिळवली आणि एक नवा विक्रम केला. हे अॅप आता अॅप स्टोअर तसेच प्ले स्टोअरवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. तर अवघ्या ७ तासांतंच १० कोटी डाऊनलोड्सचा आकडा पार केलेल्या या अॅपचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.
थ्रेड्ससाठी साइन अप कसे कराल?
- सर्वप्रथम थ्रेड्स, इन्स्टाग्राम अॅप हे तुम्हाला अॅप स्टोअर किंवा प्ले स्टोअरमधून डाउनलोड करावे लागेल.
- त्यानंतर तुम्ही तुमचे इंस्टाग्राम खाते क्रेडेन्शियल वापरून थ्रेडसाठी साइन-अप करू शकता. तुम्ही तुमच्या फोनवर अॅप डाउनलोड करताच, तुम्हाला ‘लॉग इन विथ इंस्टाग्राम’असा पर्याय मिळेल, तुम्हाला त्यावर क्लिक करावे लागेल.
- यानंतर तुम्हाला तुमचे इंस्टाग्राम क्रेडेंशियल्स टाकावे लागतील. तुम्ही आधीच इंस्टाग्राम खात्यात लॉग इन केले असल्यास, साइन-अप प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला फक्त एक टॅप करण्याची आवश्यकता आहे.
- आता तुम्हाला थ्रेड्ससाठी तुमचे युजरनेम बदलायचे आहे की तेच इन्स्टा युजरनेम ठेवायचे आहे, हे ठरवून तुम्ही त्याप्रमाणे हवा तो निर्णय घेऊ शकता.
- इंस्टाग्राम द्वारे साइन अप केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या प्रोफाइलवर नेले जाईल. मग तुम्ही बायो ही बदलू शकता किंवा इन्स्टाचाच ठेवू शकता.
- तुम्ही इन्स्टावरील फॉलोवर्सना थेट फॉलो करु शकता किंवा हवं त्या अकाउंटला फॉलो करु शकता. तसंच अकाऊंट प्रायव्हेट कि प्रोफईल हे ठरवण्याचा पर्यायही असतो.