तुम्हालाही झोप येत नाही? ही असू शकतात कारणं

तुम्हालाही झोप येत नाही? ही असू शकतात कारणं

आजकाल धावपळीच्या जीवनात बऱ्याचदा आपले खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होत असते. त्यामुळे अनेक वेळा निद्रानाश म्हणजेच झोप न लागण्याच्या समस्या उद्भवू शकतात. मग अपुऱ्या झोपेमुळे आपल्याला अनेक व्याधी उदभवू लागतात. काहो वेळेला झोप न लागण्याचे कारण कुटुंब,ऑफिस, पैसे इत्यादींची चिंता हे देखील असू शकते. त्यामुळे झोप न लागण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष न करता त्यावर वेळीच उपाय केले पाहिजे. तर पाहूया झोप न लागण्याची मुख्य कारणे-

रात्री झोप का लागत नाही ?

  • झोप न येण्यामागे मानसिक तणाव देखील कारणीभूत असू शकतो. कारण बऱ्याचदा ताण ताणतणावाखाली असल्याने आपल्या मनात वेगवेगळे विचार सुरु असतात मग अश्यावेळी झोप लागत नाही .
  • वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करणे – आजकाल बरेच लोक वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करतात. असे केल्याने झोपेवर बराच परिणाम होतो. त्यामुळे जर तुम्हालाही झोप लागत नसेल तर आपल्या वर्किंग शिफ्टकडे लक्ष द्या.
  • घाईगडबडीत खाणे आणि झोपणे – काही लोक झोपण्याआधी लगेच काहीतरी खातात जर तुम्हीही झोप न येण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर झोपण्याच्या किमान 2 तास आधी जेवण करा.
  • मोबाइलचा अति वापरणे – अनेकांना सतत मोबाईल वापरण्याची सवय असते, त्यामुळे बेडवरही फोन चालवण्याने बऱ्याच वेळा झोपेवर परिणाम होतो. अशावेळी चांगल्या झोपेसाठी किमान एक तास आधी मोबाईलचा वापर करू नका.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version