कोरोना काळात राज्यभरात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. तर, या नियमांचे पालन करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात येत होते. मात्र, आता कोरोनामुळे राज्यात लागू केलेले निर्बंध पूर्णत: हटवण्यात आले आहेत. गुढीपाडव्याच्या शुभमुर्हुतावर महाराष्ट्र कोरोना निर्बंधमुक्त होणार असल्याचा निर्णय राज्य स्तरावर घेण्यात आला आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले की, ‘आज मंत्रीमंडळात कोरोनाचे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले. त्यामुळे गुढी पाडव्याच्या मिरवणूका जोरात काढा. रमजान उत्साहात साजरा करा. बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा.’
गुडीपाडव्याच्या मुर्हुतावर महाराष्ट्र कोरोना निर्बंधमुक्त करण्याचा निर्णय राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानुसार नागरिकांनी मास्क वापरण्याची सक्ती नाही तसेच मास्क वापरणे हे नागरिकांवर अवलंबून आहे. गुढीपाडव्याला महाराष्ट्रातील कोरोना निर्बंध हटवल्यामुळे गुढीपाडव्यांच्या मिरवणुका, शोभायात्रा काढता येणार आहेत. तसेच रमजानच्या मिरवणुकासुद्धा काढता येणार आहेत.
महाराष्ट्र कोरोना निर्बंधमुक्त
राज्यात सर्व कोरोना निर्बंध हटवले
गुढीपाडव्यांच्या मिरवणुका,शोभायात्रा काढता येणार
राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने मोठा निर्णय
पाडव्याच्या आधी मोठा दिलासा
मास्कची सक्ती नाही
मास्क वापरणं नागरिकांवर अवलंबून
मास्क वापरला नाही म्हणून कारवाई होणार नाही
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी होणार
रमजानच्या मिरवणुका सुद्धा काढता येणार
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.