राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प २०२२-२३ सादर केला आहे. यापूर्वी गुरुवारी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला होता. राज्याच्या २०२२-२३च्या अर्थसंकल्पात राज्य अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
राज्याच्या पीकविमा योजनेत बदल प्रस्तावित असल्याचे संकेत अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. एक लाख हेक्टरवर फळबागेचे उद्दिष्ट असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यात शेळी संवर्धन प्रकल्पाची सरूवात करण्याचेही अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे. तर पदुम विकासासाठी ६०० कोटींच्या नीधीला मंजूरी देण्यात आली आहे. कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठाला प्रत्येकी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचेही अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे.
देशात कोरोना काळात सर्वत्र मोठे संकट उद्भवले होते. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या तुलनेते जास्त होती. मात्र, आता कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तर राज्यात १५ लाखांपेक्षा अधिक नागरिक लसवंत झाले असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. तसेच निवडक जिल्ह्यात १०० खाटांची रुग्णालये दाखल करण्यात आले असल्याचेही सांगितले. खानापूर येथे टाटा कर्करोग निवारण रुग्णालय उभारण्यात आली असून वैद्यकीय क्षेत्र विकासासाठी भरीव सहकार्य असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.
राज्यात नागरी बालक विकास केंद्र उभारण्यात येणार असून धरमतर खाडीवर चौपदरी पूलांची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच समृद्धी विस्तारासाठी निधी देणार असल्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली आहे. अर्थमंत्र्यांनी मेट्रोबाबतही मोठी घोषणा केली आहे. मुंबई मेट्रो कुलाबापर्यंत नेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्यात बुलेट ट्रेनसाठी केंद्र सरकारकडे आग्रही असल्याचेही अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे.
राज्यात शंभरहून अधिक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारापोटी अर्थमंत्र्यांनी ४१०७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर रापम विकासासाठी विशेष प्रयत्न असल्याचेही अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे.
राज्यात ई-वाहन वापर १० टक्के ते २५ टक्के वाढवणार असून राज्यात ५ हजार वाहन चार्जिंग सुविधा उभारणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. महसूल क्षेत्रात संशोधन क्षेत्रासाठी ५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच तृतीय पंथीयांना स्वतंत्र्य ओळखपत्र आणि शिधापत्रिका देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा विधिमंडळात करण्यात आली आहे. तर भीमा-कोरेगाव स्मृतीस्तंभ विकास करणार असल्याचेही अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
स्व. भारतरत्न लतादीदी मंगेशकर संगीत विद्यालयासाठी १०० कोटींचा निधी देण्यात आला आहे. थोर पुरुष यांच्या मूळ गावातील शाळांना १ कोटींच्या निधींची तरतूद देण्यात आली आहे. तसेच थोर समाजसुधारक नावाने अध्यापन केंद्र सुरू करणार असल्याचेही अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.