बंगळुरू, २८ ऑगस्ट, प्रतिनिधी : भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेची सुरुवात झाली असून प्रज्ञान रोव्हरने चंद्रावरील दक्षिण ध्रुवावरील मातीचे परीक्षण सुरू केले आहे. विक्रम लँडरने तापमानाची नोंद पाठवल्याची माहिती इसरोने रविवारी ट्वीट करत दिली. अंतराळ विज्ञानाच्या इतिहासात पहिल्यांदा चांद्रयान-३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील मातीचे परीक्षण केले. पृष्ठभागाच्या खाली १० सेमी. पर्यंत तापमानात फरक दिसून येत असल्याचे इसरोने सांगितले.
Chandrayaan-3 Mission: First observations from the ChaSTE (Chandra's Surface Thermophysical Experiment) payload onboard Vikram Lander: ISRO The presented graph illustrates the temperature variations of the lunar surface/near-surface at various depths, as recorded during the… pic.twitter.com/PeOi0XQCrf — ANI (@ANI) August 27, 2023
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर पहिल्यांदाच इसरोने मातीच्या तापमानाचा आलेख शेअर केला आहे. चंद्राच्या पृष्ठभागापासून जसजसे खाली जावे तसे तापमान कमी होते.
चंद्राच्या पृष्ठभागापासून वर १० मिमी उंचीवर तापमान ५६ अंश सेल्सिअस तर चंद्राच्या पृष्ठभागाचे तापमान ४८ अंश सेल्सिअस आहे. चंद्राच्या पृष्ठभागापासून २० मिमी खाली तापमान ३५ अंश सेल्सिअस तर चंद्राच्या पृष्ठभागापासून ४३ मिमी खाली तापमान २३ अंश सेल्सिअस आहे. चंद्राच्या पृष्ठभागापासून ६३ मिमी खाली तापमान ६ अंश सेल्सिअस तर चंद्राच्या पृष्ठभागापासून ८२ मिमी खाली तापमान उणे १० अंश सेल्सिअस आहे.
दक्षिण ध्रुवाभोवती चंद्राच्या मातीचे तापमान प्रोफायलिंग करण्याची ही पहिलीच वेळ आहे. चांद्र मोहिमेद्वारे पाठविण्यात आलेल्या उपकरणांमध्ये १० वेगवेगळे तापमानाचे सेंसर आहेत. या संदर्भात पुढील संशोधन सुरू आहे.
भारताच्या चांद्रयान-३ ने चंद्राविषयी माहिती देण्यास सुरुवात केली आहे. विक्रम लँडर आणि रोव्हर प्रज्ञानवरील सर्व उपकरणे व्यवस्थित काम करत आहेत. लँडर विक्रमने चंद्राच्या पृष्ठभागाचे तापमान तपासले आहे. चंद्राच्या पृष्ठभागाचे तापमान जाणून घेण्यासाठी विक्रम लँडरवरील ‘मून सरफेस थर्मोफिजिकल एक्सपेरिमेंट पेलोड’वरून पहिले निरीक्षण केले गेले. इसरोने जारी केलेल्या आलेखामध्ये पेलोड जसजसे खोलीकडे सरकत आहे तसतसे चंद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात चढ – उतार दिसत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.