कोलकाता : कोलकाता बलात्कार, हत्या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिले. आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयात ३१ वर्षांच्या डॉक्टरवर बलात्कार झाला. यानंतर डॉक्टरची हत्या करण्यात आली. या प्रकरणी सीबीआयने चौकशी करावी तसेच साक्षीदारांच्या आणि पीडितेच्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी आवश्यक ते उपाय करावेत असे निर्देश कोलकाता उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. तपासाच्या प्रगतीचे वेळोवेळी अहवाल सादर करावे, असेही निर्देश कोलकाता उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.