भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरे यांच्याशी निगडित कागदपत्र सादर करून रश्मी ठाकरे यांनी अलिबागमधील १९ बंगल्यांचा कर भरला असल्याचे म्हणाले होते. सोमय्या यांनी केलेल्या खुलास्याबाबत राजकीय वर्तुळात नवा वाद तयार झाला आहे. दरम्यान, या बंगल्यांच्या वादात नवी माहिती समोर आली आहे. किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरे यांचे मुखत्यार पत्र दाखविले आहे.
अलिबागमधील १९ बंगल्यांबाबत रश्मी ठाकरे यांच्याकडून कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही, असे कोर्लई ग्रामपंचायतीने दावा केला आहे. तर शिवसेनेने केलेल्या दावाच्या उत्तारदाखल किरीट सोमय्यांनी रश्मी ठाकरे यांचा पत्रव्यवहार सार्वजनिक केला आहे. या पत्रव्यवहारात, ‘रश्मी ठाकरे आणि मनिषा रविंद्र वायकर यांनी संबंधित संपत्तीचे मुखत्यारपत्र हेमंत शांताराम पाटील यांना दिले असल्याचे दिसत आहे. यांच्यामार्फत ग्रामपंचायतीसोबत झालेला पत्रव्यवहार दिनांक २३ मे २०१९ रोजी झालेला असून या पत्राद्वारे वादग्रस्त बंगल्यांची घरपट्टी नावावर करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. सदरचा प्रस्ताव स्वत:हा कोर्लईचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी स्वाक्षरी करून मंजूर केला आहे.’
अलिबागमधील बंगल्यांचा कर रश्मी ठाकरे यांच्या नावे कर भरण्यात आले असल्याचे सोमय्या म्हणाले. त्यामुळे जर हे बंगले ठाकरेंशी संबंधित नव्हेत तर रश्मी ठाकरेंनी मालमत्ता कर का भरला? असा सवाल किरीट सोमय्यांनी उपस्थित केला आहे. तसेच रश्मी ठाकरे यांच्यासोबत मनिषा वायकर यांनीही कर भरला असल्याचे सोमय्या म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.