मुंबई, 2 मे २०२३, प्रतिनिधी :बॉलिवूडचाअभिनेता कार्तिक आर्यन यानं अलिकडेच त्याच्याकडे बॉडीगार्ड म्हणून काम करणाऱ्या सचिनच्या लग्नात आवर्जून सहभागी झाला होता. इतकंच नाही तर त्यानं नवदांपत्याबरोबर फोटो देखील काढले. नवदांपंत्यांसोबतच कार्तिकने लग्नसमारंभात असणाऱ्या त्याच्या चाहत्यांसोबत देखील फोटोज काढले. कार्तिकआर्यननं हा फोटो समाज माध्यमांवर सामायिक केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर भरभरून प्रतिक्रिया व्यक्त केल्या.कार्तिकने बॉडीगार्डच्या लग्नाचे काही फोटोज समाज माध्यमांवर सामायिक केले असून या फोटोला त्याने “सचिन व सुरेखा हार्दिक अभिनंदन. पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा,” असं कॅप्शन देत त्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. कार्तिक आर्यनच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
आपल्या बॉडीगार्डच्या लग्नाला जाणाऱ्या कार्तिक आर्यनचं सर्वत्र कौतुक होतं. लग्नातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्न जरी कार्तिकच्या बॉडीगार्डचं असलं तरी चाहत्यांनी मात्र कार्तिकला चांगलेच प्रश्न विचारलेत.दरम्यान, कार्तिक आर्यन चित्रपटांची मेजवानी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सत्यप्रेम की कथा’, ‘आशिकी ३’ व ‘कॅप्टन इंडिया’ या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये तो व्यग्र आहे. कार्तिक ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.