खास व्यक्तीसाठी कार्तिकने केली भावुक पोस्ट

खास व्यक्तीसाठी कार्तिकने केली भावुक पोस्ट

मुंबई,६ मे २०२३, प्रतिनिधी : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा त्याच्या चित्रपटांप्रमाणेच त्याच्या लूक्समुले देखील नेहमी चर्चेत असतो. दरम्यान आता तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. कार्तिकची आई माला तिवारीने कर्करोगासारख्या धोकादायक आजारावर मात करून आयुष्यातील एक मोठी लढाई जिंकली आहे.

अलीकडेच अभिनेता कार्तिक आर्यनने त्याच्या इंस्टाग्रामवर एक भावुक पोस्ट सामायिक केली होती. यात त्याने आपल्या आयुष्यातील एका कठीण टप्प्याबद्दल सांगितले. यात कार्तिकने त्याच्या आईने आता कर्करोगावर मात केल्याची बातमी दिली. कार्तिक आर्यनच्या आईला स्तनाचा कर्करोग झाला होता. काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या आईचा हा संपूर्ण प्रवास एका पोस्टद्वारे समाज माध्यमांवर सामायिक केला होता. त्यावेळी त्याचे डोळे भरून आले होते.

कार्तिकने आता आणखी एक पोस्ट समाज माध्यमांवर सामायिक केली आहे. आपल्या या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, “या महिन्यात बिग सीने अर्थात ‘कॅन्सर’चा आमच्या घरात शिरकाव केला होता. त्याने आमच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्ही हताश, निराश आणि असहाय झालो होतो. पण या लढवय्यीचे आभार, जिच्या इच्छाशक्ती आणि कधीही हार न मानण्याच्या वृत्तीने या सगळ्यावर मात करत विजय मिळवला मिळवला. या काळात आम्ही मोठ्या हिंमतीने आणि पूर्ण ताकदीने लढलो आणि जिंकलो. या सगळ्यात मला एक गोष्ट कळली ती म्हणजे आपल्या कुटुंबाच्या प्रेम आणि पाठिंब्यापेक्षा मोठी शक्ती कुठेच नाही.”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version