जेजुरी विश्वस्तपदाचा वाद निवळला

जेजुरी विश्वस्तपदाचा वाद निवळला

जेजुरी विश्वस्तपदाचा वाद निवळला आहे. जेजुरी ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे.

खंडोबा मंदिराच्या विश्वस्त मंडळाची संख्या ७ वरून ११ होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच, खंडोबा मंदिराच्या विश्वस्तपदी ६ ग्रामस्थांची निवड होणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.

जेजुरीतील खंडोबा मंदिराच्या विश्वस्त निवडीच्या विरोधात जेजुरीत सर्वपक्षीय ग्रामस्थांचे आंदोलन सुरु होते. दरम्यान, गेल्या ११ दिवसांपासून ग्रामस्थांनी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने जेजुरी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती. यामध्ये ग्रामस्थांच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, माजी मंत्री विजय शिवतारे, विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि मनसेचे राज ठाकरे यांना देखील भेटून ग्रामस्थांनी आपल्या व्यथा मांडल्या होत्या. अखेर जेजुरीतील ग्रामस्थांना यामध्ये यश आले आहे. यामुळे जेजुरीतील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version