समेद शिखर बचावासाठी जैन समाज रस्त्यावर

समेद शिखर बचावासाठी जैन समाज रस्त्यावर

सम्मेद शिखरचा वाद काय?
जैन समाजाचे तीर्थक्षेत्र असलेले सम्मेद शिखर सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. सम्मेद शिखराबाबत झारखंड सरकारने दिलेले आदेश या वादाच्या मुळाशी आहेत. या आदेशाच्या विरोधात देशभरातील जैन समुदाय आक्रमक झालाय. केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाने पारसनाथ टेकडीचा एक भाग वन्यजीव अभयारण्य आणि इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केला आहे, तर झारखंड सरकारने आपल्या पर्यटन धोरणात तो धार्मिक क्षेत्र म्हणून दाखवला आहे.

कुठे आहे सम्मेद शिखर?
सम्मेद शिखर झारखंड राज्यातील, गिरिडीह जिल्ह्यात पर्सनाथ पर्वतावर बनलेले तीर्थस्थळ आहे.
ह्या शिखराची उंची ३५० मीटर आहे.
हे झारखंड राज्यातील सर्वात उंच टेकडीवर वसलेले आहे
ही टेकडी झारखंडचा हिमालय म्हणून ओळखली जाते.
हे सर्वात महत्त्वाचे जैन तीर्थक्षेत्र मानले जाते.
याला सिद्धक्षेत्र देखील म्हणतात आणि जैनधर्मीय याला ‘तीर्थक्षेत्राचा राजा’ मानतात.
चोवीस जैन तीर्थंकरांपैकी वीस जणांनी इथेच मोक्षप्राप्ती घेतली असे मानले जाते.

जैन समुदायाचे आक्षेप काय?
धार्मिक स्थळाला पर्यटन स्थळ घोषित केल्यास त्याचे पावित्र्य धोक्यात येईल.
पर्यटनाच्या निमित्ताने सम्मेद शिखर इथे दारूसेवन आणि मांसाहार होईल.
जैन समुदायासाठी ही कृत्य अनैतिक आहेत.

यानिमित्ताने आंदोलकांची मागणी आहे की, केंद्र आणि राज्य सरकारने सम्मेद शिखर पर्यटन स्थळ म्हणून घोषित करणारी अधिसूचना मागे घ्यावी.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version