इस्रोचे नवे उड्डाण

इस्रोचे नवे उड्डाण

भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोकडून SSLV D2 लाँच केले आहे. या रॉकेटमधून पृथ्वी निरिक्षण उपग्रहासह काही लहान उपग्रहांना पृथ्वीभोवतीच्या कक्षेत सोडण्यात आले आहे.
लहान उपग्रह प्रक्षेपण वाहन एसएसएलव्ही डी २ या इसरोचे दुसरे यशस्वी उड्डाण शुक्रवारी १० फेब्रुवारी २०२३ रोजी श्रीहरिकोटा येथून करण्यात आले. हे उड्डाण श्रीहरीकोटा येथील पहिल्या प्रक्षेपण पॅडवरून शुक्रवारी सकाळी ०९:१८ वाजता यशस्वीरित्या पार पडले आहे. पृथ्वी निरीक्षण उपग्रह – ईओएस – 07 , जानस – 1, आझादी सॅट – 2 या तीन उपग्रहांचे प्रक्षेपण केले. या रॉकेटमधून अमेरिकन कंपनी अँटरीसचा ‘जानस 1’ आणि देशभरातील विद्यार्थिनींनी बनवलेल्या ‘आझादी सॅट-2’ या लहान उपग्रहांना पृथ्वीभोवती ४५० किमीच्या वर्तुळाकार कक्षेत सोडण्यात आले.

एसएसएलव्हीचे वैशिष्ट्य काय?

एसएसएलव्ही हे भारतातील पहिले छोटे उपग्रह प्रक्षेपक म्हणजेच रॉकेट लाँचर आहे. पूर्वी, लहान उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यासाठी पीएसएलव्ही रॉकेटचा वापर केला जायचा. पीएसएलव्ही लाँच पॅडवर आणण्यासाठी आणि असेंबल करण्यासाठी दोन ते तीन महिने लागतात पण एसएसएलव्ही केवळ २४ ते ७२ तासांत असेंबल करता येते. एसएसएलव्हीचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे कमी किमतीत, कमी वेळेत, अनेक उपग्रहांना सामावून घेऊन कधीही, कोठूनही प्रक्षेपित केले जाते.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version