Instagram Ban in India: 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम भारतात बंद होणार? सरकारने स्पष्टच सांगितलं

या दाव्यामुळे अनेक Instagram वापरकर्ते, कंटेंट क्रिएटर्स आणि ऑनलाइन व्यवसाय करणाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.
Instagram Ban in India: 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम भारतात बंद होणार? सरकारने स्पष्टच सांगितलं

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून 25 ऑगस्टपासून भारतात Instagram बंद होणार असा दावा मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या दाव्यामुळे अनेक Instagram वापरकर्ते, कंटेंट क्रिएटर्स आणि ऑनलाइन व्यवसाय करणाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, केंद्र सरकारने या दाव्यावर स्पष्टीकरण देत तो पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे.

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या (PIB) फॅक्ट चेक युनिटने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टची पडताळणी केली. PIB ने सांगितले की, भारत सरकारने 25 ऑगस्टपासून Instagram वर बंदी घालण्यासंदर्भात कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरत असलेला दावा दिशाभूल करणारा असून त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. 

PIB फॅक्ट चेकने नागरिकांना केवळ अधिकृत सरकारी स्रोतांवरच विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तसेच सरकारशी संबंधित कोणताही संशयास्पद संदेश, फोटो किंवा व्हिडिओ आढळल्यास तो पडताळणीसाठी PIB फॅक्ट चेककडे पाठवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. 

विशेष म्हणजे, Instagram बंद होणार असल्याचा दावा यापूर्वीही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र, प्रत्येक वेळी तो खोटा ठरला आहे. सध्या भारतात Instagram नेहमीप्रमाणे सुरू असून त्यावर कोणत्याही प्रकारची बंदी घालण्याबाबत सरकारकडून कोणताही अधिकृत आदेश जारी करण्यात आलेला नाही. 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version