AIMSA Letter to S Jaishankar: इराणमधील हिंसाचारामुळे 3000 भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात; परराष्ट्र मंत्र्यांच्या हस्तक्षेपाची मागणी

इराणमधील परिस्थिती वेगाने बिघडत असून आंदोलने आणि सुरक्षा दलांमध्ये हिंसक संघर्ष सुरू आहेत.
AIMSA Letter to S Jaishankar: इराणमधील हिंसाचारामुळे 3000 भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात; परराष्ट्र मंत्र्यांच्या हस्तक्षेपाची मागणी

AIMSA Letter to S Jaishankar: इराणमध्ये आर्थिक चणचण आणि वाढत्या महागाईवरून सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांमुळे तेथील सुमारे 3,000 भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर, 'ऑल इंडिया मेडिकल स्टुडंट्स असोसिएशन' (AIMSA) ने परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहून तातडीने हस्तक्षेप करण्याची आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. इराणमधील परिस्थिती वेगाने बिघडत असून आंदोलने आणि सुरक्षा दलांमध्ये हिंसक संघर्ष सुरू आहेत. जम्मू-काश्मीर एआयएमएसएचे उपाध्यक्ष मोहम्मद मोमीन खान यांनी परराष्ट्र मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, इराणच्या विविध वैद्यकीय विद्यापीठांमध्ये सुमारे 3,000 भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे विद्यार्थी स्थानिक पायाभूत सुविधा आणि वसतिगृहांवर अवलंबून असल्याने, अस्थिरतेच्या काळात ते अधिक असुरक्षित बनले आहेत. या अनिश्चिततेमुळे विद्यार्थी आणि त्यांच्या भारतात असलेल्या कुटुंबियांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण आहे.

हेही वाचा – Saudi Arabia Airstrike in Yemen : सौदी अरेबियाचा येमेनवर भीषण हवाई हल्ला; 20 ठार, यूएईसोबतचा तणाव शिगेला

एआयएमएसएने परराष्ट्र मंत्रालयाला काही महत्त्वाच्या उपाययोजना करण्याची विनंती केली आहे, ज्यामध्ये भारतीय दूतावासाशी समन्वय मजबूत करणे, समर्पित आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जारी करणे, वेळेवर अधिकृत सूचना देणे आणि आवश्यक भासल्यास विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी 'इव्हॅक्युएशन प्लॅन' (स्थलांतर योजना) तयार ठेवणे यांचा समावेश आहे. दरम्यान, जम्मू आणि काश्मीर स्टुडंट्स असोसिएशनने (JKSA) देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून इराणमधील काश्मिरी विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा – America Attack Venezuela: अमेरिकेचा व्हेनेझुएलावर भीषण हवाई हल्ला; राजधानी कराकस स्फोटांनी हादरली, देशात आणीबाणी जाहीर

इराणमधील या अंतर्गत अशांततेकडे जगाचे लक्ष वेधले गेले असून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानला कडक इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना म्हटले की, जर इराणी अधिकाऱ्यांनी शांततापूर्ण निदर्शकांना लक्ष्य केले, तर अमेरिका त्यांच्या मदतीसाठी हस्तक्षेप करण्यास तयार आहे. ट्रम्प यांच्या या भूमिकेचे इराणचे माजी युवराज रेझा पहलवी यांनी स्वागत केले आहे, तर इराण सरकारने अमेरिकेच्या या विधानांचा तीव्र निषेध केला आहे.

दरम्यान, इराणमध्ये सध्या अनेक ठिकाणी इंटरनेटवर निर्बंध घालण्यात आल्याच्या बातम्या येत असल्याने, भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत संवेदनशील बनला आहे. भारत सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून आगामी काही दिवसांत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version