रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनची राजधानी कीव येथे झालेल्या गोळीबारात आणखी एक विद्यार्थी जखमी झाला आहे. केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांनी या घटनेची माहिती दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच रशिया-युक्रेन युद्धामध्ये भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर युद्धातील गोळीबारात आणखी एक भारतीय विद्यार्थी जखमी झाला आहे. जखमी विद्यार्थ्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रशिया-युक्रेन युद्धाचा आज नववा दिवस आहे. रशियाची युक्रेनवर तीव्र लढाई सुरूच असून तणावग्रस्त परिस्थिती उद्भवली आहे. आज पहाटे रशियाच्या लष्करी सैन्याने युक्रेनच्या एनरहोदर शहरातील वीज केंद्रावर हल्ला केला. झापोरीझिया अणूऊर्ज प्रकल्पावर रशियाने हल्ला केला असून या हल्ल्यामुळे अणू प्रकल्पाला भीणण आग लागली.
१ मार्च रोजी युक्रेनमधील खारकिव्हमध्ये झालेल्या गोळीबारात भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. नवीन शेखराप्पा असे या विद्यार्थ्यांचे नाव असून हा कर्नाटकातील रहिवासी आहे. तर २ मार्च रोजी आणखी एका दिवंगत विद्यार्थ्याचा प्रदीर्घ आजारपणामुळे मृत्यू झाला आहे. चंदन जिंदल असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.