Indian Railway: ऐन महागाईच्या काळात सर्वसामान्यांना मोठा दिलासा, रेल्वे प्रवासात मिळणार मोठी सुविधा? महत्त्वाची अपडेट समोर

आगामी काळात प्रवाशांसाठी नव्या सुविधा आणि प्रकल्पांना वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Indian Railway: ऐन महागाईच्या काळात सर्वसामान्यांना मोठा दिलासा, रेल्वे प्रवासात मिळणार मोठी सुविधा? महत्त्वाची अपडेट समोर

भारतीय रेल्वेच्या आर्थिक व्यवस्थापनाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गेल्या काही वर्षांत रेल्वेने घेतलेल्या मोठ्या कर्जाची परतफेड करण्यात आली असून, आता विकासकामांसाठी रेल्वेच्या आर्थिक क्षमतेला आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेची आर्थिक स्थिती आणि भविष्यातील विस्ताराबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे आगामी काळात प्रवाशांसाठी नव्या सुविधा आणि प्रकल्पांना वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील पाच वर्षांच्या कालावधीत रेल्वेने सुमारे १.९३ लाख कोटी रुपयांची कर्जाची रक्कम फेडली आहे. यामध्ये कर्जाच्या मुद्दलासोबत मोठ्या प्रमाणात व्याजाचीही परतफेड करण्यात आली. रेल्वेने जवळपास ९३ हजार कोटी रुपयांचं व्याज भरल्याचं सांगण्यात आलं आहे. कोरोना काळात रेल्वेला केंद्राच्या अर्थ मंत्रालयाकडून सुमारे ७९ हजार कोटी रुपयांचं कर्ज घ्यावं लागलं होतं. त्याचबरोबर यापूर्वी घेतलेल्या कर्जाचीही परतफेड करण्यात आली आहे.

रेल्वेच्या आर्थिक स्थितीत झालेल्या या बदलामुळे आता विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. केंद्राच्या अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे रेल्वेला आर्थिक पाठबळ मिळालं असून, त्याचा वापर नवीन रेल्वेगाड्या, रेल्वे मार्गांचा विस्तार, स्थानकांचा विकास आणि मेट्रोसारख्या पायाभूत सुविधांसाठी केला जात आहे. याशिवाय रेल्वेच्या डिजिटलायझेशनवरही भर दिला जात आहे.

अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, पूर्वी रेल्वेच्या अनेक विकास प्रकल्पांसाठी कर्जावर अवलंबून राहावं लागत होतं. मात्र, आता सरकारी निधीच्या माध्यमातून प्रकल्पांना चालना दिली जात आहे. मुंबईसह देशातील विविध रेल्वे स्थानकांच्या विस्ताराची कामंही वेगाने सुरू आहेत. त्यामुळे कर्जाचा भार कमी झाल्यानंतर रेल्वे प्रवाशांना भविष्यात आणखी कोणत्या सुविधा मिळणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version