भारत नौदलासाठी २६ राफेल खरेदी करणार

भारत नौदलासाठी २६ राफेल खरेदी करणार

नवी दिल्ली, २९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : भारत सरकार नौदलासाठी २६ राफेल विमानांची खरेदी करणार आहे. यासाठीचा ५.५ अब्ज डॉलरचा करार लवकरच होणार आहे. या कराराबाबत चर्चा करण्यासाठी फ्रान्सचे एक शिष्टमंडळ भारतात येऊन गेले. भारत आणि फ्रान्सच्या शिष्टमंडळाने कराराशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर सविस्तर चर्चा केली. या चर्चेत भारतीय नौदलाचे वरिष्ठ अधिकारी पण सहभागी झाले होते.

याआधी भारताच्या वायुदलासाठी फ्रान्सकडून ३६ राफेल विमानांची खरेदी करण्यात आली. आता भारतीय नौदलासाठी २६ राफेल विमानांची खरेदी होणार आहे. नौदलाच्या राफेल विमानांना राफेल मरीन या नावाने ओळखले जाणार आहे.

वायुदलाप्रमाणेच नौदलाच्या राफेल विमानांमध्ये ब्राह्मोस, अस्त्र अशी भारताची वेगवेगळी क्षेपणास्त्र डागण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यामुळे राफेलच्या संहारक क्षमतेत वाढ होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version