Pakistan Army: भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूरची’ दहशत कायम; घाबरलेल्या पाकिस्तानने बॉर्डरवरून काढला पळ

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली असून सीमेजवळील 72 अतिरेकी लाँचपॅड्स आतल्या भागात हलवले गेले आहेत. जैश आणि लष्करला एकत्र प्रशिक्षण देण्याचा पाकिस्तानचा डावही उघडकीस आला आहे.
Pakistan Army: भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूरची’ दहशत कायम; घाबरलेल्या पाकिस्तानने बॉर्डरवरून काढला पळ

नवी दिल्ली: भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या जोरदार कारवाईनंतर पाकिस्तान चांगलाच बिथरला आहे. सीमेलगत सक्रिय असलेल्या अतिरेकी तळांची हालचाल हेच सिद्ध करते. बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने सीमेजवळील 72 अतिरेकी लाँचपॅड्स तातडीने सीमेपासून आतल्या भागात शिफ्ट केले आहेत. भारताकडून पुन्हा कारवाई होईल या धास्तीने पाकिस्तान आता अक्षरशः बचावात्मक भूमिकेत आहे.

बीएसएफचे डीआयजी विक्रम कुंवर यांनी सांगितले की पाकिस्तानकडील लाँचपॅड्स कधीच कायमस्वरूपी एका जागी नसतात. सतत जागा बदलून लक्ष विचलित करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असतो. सियालकोट आणि जफरवॉलच्या खोल भागात सध्या 12 लाँचपॅड्स सक्रिय असून उर्वरित 60 तळ पाकिस्तानच्या संवेदनशील भागात मधूनमधून शिफ्ट केले जात आहेत. हे लाँचपॅड्स तेव्हाच सक्रिय होतात जेव्हा अतिरेक्यांना भारताच्या सीमेत पाठवण्याचे डाव खेळले जातात. डीआयजी कुंवर यांनी हेही स्पष्ट केले की सीमेच्या अत्यंत जवळ आता एकही ट्रेनिंग कॅम्प नाही, हे पाकिस्तानच्या भीतीचे सर्वात मोठे पुरावे मानले जात आहेत. मात्र भारतीय सीमा सुरक्षा दल पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

हेही वाचा: Noida Horror: नोएडा हादरलं! लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने 25 वर्षीय तरुणीवर झाडल्या गोळ्या

दरम्यान, पाकिस्तानने आता जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा या दोन्ही दहशतवादी संघटनांना एकत्र प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. आधी या संघटना स्वतंत्र काम करत होत्या; पण ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी एजन्सींनी दोघांना एकत्र प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही नव्या कारवायेला वेग देण्यासाठी हा डाव असू शकतो, परंतु भारतीय सुरक्षा दल याला पूर्णपणे सज्ज आहे.

बीएसएफचे आयजी शशांक आनंद यांनी पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिला “बीएसएफने 1965, 1971, 1999 कारगिलसह आता ऑपरेशन सिंदूरसारख्या मोठ्या मोहिमा अनुभवल्या आहेत. गरज पडल्यास आम्ही शत्रूला त्याची किंमत अधिक मोठी चुकवायला लावू.” तसेच, सरकारकडून आदेश मिळताच ऑपरेशन सिंदूर 2.0 करण्यासही बीएसएफ सज्ज असल्याचे त्यांनी नमूद केले.

ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तान रेंजर्स भयभीत होऊन त्याच्या पोस्ट सोडून पळाले होते. आता मात्र ते परत पोस्टवर आले असले तरी पाकिस्तानच्या हालचाली अतिशय सावध आहेत. याउलट भारताचे जवान नेहमीप्रमाणे सज्ज, सतर्क आणि कठोर नजरेने संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. भारताचा संदेश स्पष्ट आहे, सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न केला, तर यावेळी किंमत अधिक मोठी भरावी लागेल.

हेही वाचा: Bank Holidays in December 2025: डिसेंबर महिन्यात एकूण 19 दिवस बँका राहणार बंद ; सलग 5 दिवस असणार सुट्टी

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version