राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर विधानसभेत भाष्य केले. यावेळी, आमदारांना स्थानिक विकास निधीमध्ये वाढ करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. मात्र, ही घोषणा होताच आमदारांनी गाडीचीदेखील मागणी सुरू केल्यानंतर अजित पवारांनी त्यांच्या शैलीत आमदारांना उत्तर दिले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व आमदारांच्या स्थानिक विकास निधीत ४ ऐवजी ५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. तर आमदारांच्या वाहनचालकाला २० हजार रुपये आणि आमदारांच्या स्वीय सहाय्यकाला ३० हजार रुपये देणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षात आमदारांच्या विकास निधीत वाढ करण्यात आली नव्हती.
आमदारांच्या पीए आणि वाहन चालकाच्या पगारातही वाढ करण्यात आली आहे. वाहनचालकाचा पगार १५ हजारांवरून २० हजार करण्यात आला आहे. तर आमदारांच्या पीएचा पगार २५ हजारांवरून ३० हजार करण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.