यवतमाळमध्ये ‘जय महाराष्ट्र’ चॅनलच्या प्रतिनिधीसोबत जमावाची झटपट

यवतमाळमध्ये ‘जय महाराष्ट्र’ चॅनलच्या प्रतिनिधीसोबत जमावाची झटपट

शुक्रवारी महागाव तालुक्यातील काळी दौलत खान येथे एका तरुणाचा खून झाल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त जमावाने जाळपोळ करत अनेक दुकानांची तोडफोड केली. या अतिगंभीर बाबीचे वार्तांकन करण्यासाठी आमचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संदेश कान्हु हे घटनास्थळी पोचले. घटनास्थळी आमदार निलय नाईक हे स्थानिक नागरिकांना संबोधित करत होते. यावेळी न्यूज कवरेज करत असताना ‘जय महाराष्ट्र’ प्रतिनिधी संदेश कान्हु यांना ५० ते ६० लोकांच्या जमावाने अचानक घेरले आणि झटपट करण्यास सुरुवात केली.

जमावाने संदेश यांच्या हातातील बुम आयडी हिसकावून घेतला तसेच संदेश यांच्यासोबत असलेले पत्रकार सैय्यद फैजान यांना जमावाने मारहाण करून त्यांच्याजवळील बॅग, बुम आयडी, कॅमेरा, रोख रक्कम असे साहित्य हिसकावून घेतले. हा सर्व प्रकार घडत असताना कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी तात्काळ दोन्ही पत्रकारांना सुखरूपरित्या घटनास्थळावरून काढले. सद्या शहरात जमावबंदी लागू करण्यात आली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version