पुण्यात मेस्मा कायद्याविरोधात कर्मचारी एकवटले

पुण्यात मेस्मा कायद्याविरोधात कर्मचारी एकवटले

आजपासून देशभरातले वीज कर्मचारी संपावर जाणार आहेत. वीज कंपन्यांचे खासगीकरण आणि विभाजनाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. पुण्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कार्यलयाच्यासमोर राज्य वीज कर्मचारी अधिकारी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिल्यामुळे पुण्यातील वीज कर्मचारी आंदोलन करत आहेत.

वीज सुधारणा कायदा २०१९च्या विरोधात सोमवारी आणि मंगळवारी आंदोलन करण्यात येणार असून देशव्यापी संप पुकारण्यात आलेला आहे. वीज कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात संपात सहभागी झाले असल्याचे दिसून येत आहे. वीज ग्राहक शेतकरी कष्टकरी जनतेच्या तसेच कर्मचारी अभियंते अधिकारी यांच्या विरोधातील भांडवलदारांना विविध क्षेत्रात मुक्त प्रवेश देणाऱ्या धोरणाच्या विरोधात हे देशव्यापी संप महाराष्ट्र राज्यातील वीज कर्मचारी कामगार अधिकारी आंदोलन करत आहेत.

वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंते आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ३९ संघटना संपावर ठाम आहेत. राज्यातील प्रमुख शहरांमधील वीज कंपनीच्या कार्यालयासमोर कर्मचारी सभाही घेणार आहेत. मात्र, वीज कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास राज्य सरकारने मनाई केली आहे. संपावर गेल्यास मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा सरकारनं दिला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version