महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. अशातच रायगडमधील महाड तालुक्यातील एकाच शाळेतील १७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. रायगडच्या न्यू इंग्लिश स्कूल विन्हेरे या शाळेतील १५ विद्यार्थी आणि २ शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या शाळेतील एका विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक अशा २३८ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी या अहवालात १५ विद्यार्थी आणि २ शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी नितीन बावलेकर यांनी दिली आहे. या शाळेतील कोरोनाबाधितांना कोणतीही कोरोना लक्षणे दिसत नसून या सर्वांना होम आयसोलेशनमध्ये उपचार देण्यात येत आहे.
राज्यात कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत असताना मुंबई हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहे. मंगळवारी राज्यात १८ हजार ४६६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर मुंबईत सर्वाधिक १० हजार ८६० कोरोना रुग्ण आढळले आहेत. मंगळवारी मुंबईत दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.