नाशिकच्या होली क्रॉस चर्चमध्ये इफ्तार मिलन

नाशिकच्या होली क्रॉस चर्चमध्ये इफ्तार मिलन

नाशिकच्या होली क्रॉस चर्चमध्ये रमजान पर्वानिमित्ताने बुधवारी एम्स चँरिटेबल ट्रस्ट आणि आम्ही नाशिक संविधान प्रेमी यांच्यातर्फे ‘बंधूभाव इफ्तार मिलन-२०२२’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू, बौद्ध, मुस्लिम, ख्रिश्चन यासह विविध धर्माचे बांधव एकत्र आले होते. सर्वांनी एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने रोजा इफ्तार केला. सायंकाळच्या मगरीच्या नमाजला जास्त वेळ नसल्याने उपस्थित मुस्लिम बांधवांना मशीदपर्यंत जाणे शक्य नव्हते. अशा वेळेस त्यांनी चर्चमध्ये असलेली एखादी खोली नमाजसाठी उपलब्ध करून द्यावी. अशी विनंती चर्चचे फादर यांना केली. सर्वधर्मसमभाव आहे मग खोली कशाला सरळ चर्चमध्ये नमाज पठण करा असे म्हणत त्यांनी चर्चमध्ये नमाजची व्यवस्था करून दिली. प्रथमच अशा प्रकारचे चित्र बघावयास मिळाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version