Dharashiv Crime : धाराशिव हादरलं! घरगुती वादातून पतीचा पत्नीवर चाकूने हल्ला; रक्ताच्या थारोळ्यात आढळला पत्नीचा मृतदेह

Dharashiv Crime : धाराशिव हादरलं! घरगुती वादातून पतीचा पत्नीवर चाकूने हल्ला; रक्ताच्या थारोळ्यात आढळला पत्नीचा मृतदेह

उदय साबळे पाटील, प्रतिनिधी 

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. भवानी नगर तांडा येथे घरगुती वादातून पतीने पत्नीवर हल्ला केल्याची घटना समोर आली असून, यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पती गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. लोहारा तालुक्यातील भवानी नगर तांडा येथे सोमवार, 21 सप्टेंबर रोजी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, आप्पाराव गुलाब राठोड आणि कमल आप्पाराव राठोड हे लोकमंगल कारखान्याजवळील शेतातील घरात राहत होते. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये घरगुती कारणांवरून वाद सुरू होता.

हेही वाचा : Crime News : अल्पवयीन जोडप्याची गुंडांकडून अडवणूक; प्रश्न विचारले…मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला…, संतापजनक घटनेने देश हादरला

दरम्यान, सोमवारी दुपारी पुन्हा झालेल्या वादातून आप्पाराव राठोड यांनी पत्नी कमल राठोड यांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात कमल राठोड गंभीर जखमी झाल्या असून त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर आप्पाराव राठोड हेही गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपते, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पवार, पोलीस उपनिरीक्षक सचिन केंद्रे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version