मुंबई, 3 मे २०२३, प्रतिनिधी :रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांना युक्रेनने मारण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. परंतु पुतीन यांना कोणतीही जीवितहानी झाली नसून ते बचावले आहेत. याबाबत संपूर्ण माहिती घेण्यासाठी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून आणखी माहिती समोर आली आहे.
युक्रेनकडून पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. पुतीन यांना मारण्याचा पुतीन यांना मारण्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला असून झेलेन्स्कींचा डाव फसला आहे. पुतीन यांना मारण्यासाठी ड्रोन हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या हल्ल्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमिर पुतीन बचावले आहेत. परंतु रशियाने केलेला हा दावा खरा की खोटा? या दाव्यावर नक्की विश्वास ठेवावा का? याचे उत्तर
युक्रेनकडून पुतीन यांना ड्रोन हल्ल्यातून मारण्याचा प्रयत्न झाला असून हा प्रयत्न अयशस्वी ठरला असून झेलेन्स्कींचा डाव फसल्याचे माहिती समोर आली आहे. परंतु रशियाचा हा दावा कितपत खरा मानव यात साशंकता आहे. कारण, युक्रेनकडून पुतीन यांना मारण्यासाठी झालेल्या ड्रोन हल्ल्यात दोन ते तीन ड्रोन क्रीमलिनवर पडले आहेत. परंतु या ड्रोन हल्ल्यात वापरलेले ड्रोन हे प्रत्येकी १७,१९ ते २० किलोग्रॅमची स्फोटकं घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे पुतीन यांना खरोखरच मारायचं असतं तर निदान ६ ते ७ ड्रोन त्यांनी क्रीमलिनवर पाठवले असते. त्यामुळे, रशियाने केलेला हा दावा खरा की खोटा हे विवादात्मक आहे.
अभय पटवर्धन, निवृत्त कर्नल
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.