‘ते’ शिवलिंग किती जुने?

‘ते’ शिवलिंग किती जुने?

वाराणसीम धील ज्ञानवापी मशीद प्रकरणी अलाहाबादउच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. ज्ञानवापी मशीद परिसरात सर्वेक्षणादरम्यान सापडलेल्या शिवलिंगाची कार्बन डेटिंग चाचणी आणि वैज्ञानिक सर्वेक्षणासाठी दाखल केलेली याचिका मान्य केली आहे.

हायकोर्टाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला मशीद परिसरात आढळलेल्या ‘शिवलिंग’ची कार्बन डेटिंग करण्याची परवानगी दिली. मात्र यावेळी शिवलिंगाला इजा न करता त्याची कार्बन डेटिंग चाचणी करण्याचे आदेश न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला दिले आहेत. वाराणसीतील न्यायालयाने कार्बन डेटिंग चाचणी घेण्यास नकार दिला होता. या आदेशाला याला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दरम्यान उच्च न्यायालयाने वाराणसी न्यायालयाचा आदेश रद्द केला आहे. न्यायमूर्ती अरविंद कुमार मिश्रा यांनी लक्ष्मी देवी आणि इतरांच्या याचिकेवर हा आदेश दिला आहे.

यावर, ज्येष्ठ अभ्यासक सच्चिदानंद शेवडे यांची प्रतिक्रिया

“हे वय शोधलं जाणं केव्हाही स्वागतार्ह आहे. याचं कारण असं की, १९४२ मध्ये शाहजहानने अल-हजीरा फर्मान काढले होते. बनारसमधील विश्वेश्वर मंदिर तोडलं ज्याचा उल्लेख बादशाह नाम्यात सापडतो. त्यानुसार एकट्या काशिदने ७६ मंदिरं पाडली. फक्त विश्वेश्वराचं मंदिर यातून वाचलं होतं. पुढे १८ एप्रिल १६६९ मध्ये औरंगजेबाने एक फर्मान काढून मंदिरं आणि वेदपाठशाळा नष्ट करण्याचे आदेश दिले. त्यामुळे जर आता याचं वय शोधलं जाणार असेल तर १६६९ पेक्षा हे शिवलिंग जुनं आहे का हे कळेल”, अशी प्रतिक्रिया अभ्यासक सच्चिदानंद शेवडे यांनी दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version