ऐतिहासिक सेंगोल नव्या संसद भवनात

ऐतिहासिक सेंगोल नव्या संसद भवनात

ऐतिहासिक सेंगोलला नव्या संसद भवनात पुनर्प्रस्थापित करणार अशी माहिती अमित शाहा यांनी दिली आहे. २८ मे रोजी मोदींच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचे उदघाटन होणार आहे. त्यावेळी सेंगोल नव्या संसद भवनात पुनर्प्रस्थापित केला जाणार आहे.

नेमकं काय आहे सेंगोल?
सेंगोल म्हणजे राजाची शक्ती. ब्रिटिशांकडून भारतीयांकडे हस्तांतरित झालेल्या सत्तेचे प्रतीक म्हणजे सेंगोल. पंडित जवाहरलाल नेहरूंना १४ ऑगस्ट १९४७ रोजी हा सेंगोल देण्यात आला. हा चांदीचा बनलेला असून त्यावर सोन्याचे आवरण आहे. ह्या कलाकृतीच्या शिरावर सुरेख नंदी आहे. मद्रासमधील वुमीडी बंगारू चेट्टी ह्या सुवर्णकाराने त्याची निर्मिती केली होती. सोन्याचा राजदंड दागिन्यांनी जडलेला होता. त्या काळात त्याची किंमत सुमारे १५ हजार रुपये होती. पंडित नेहरूंनी तिरुवदुथुराई मठाच्या प्रमुख श्री अंबलावन देसिका स्वामीगल यांनी पाठवलेला हा सेंगोल स्वीकारला. स्वातंत्र्यानंतर सेंगोल विस्मरणात गेला होता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version