कर्नाटकमध्ये हिजाबविरोधात शिक्षण संस्थांमध्ये वाद चिघळत चालला आहे. कर्नाटकमध्ये आता हिजाबचा वाद आणि भगव्या शालीचा मुद्दा समोर आला आहे. कर्नाटकमधील मुस्लिम विद्यार्थीनी हिजाब घालण्यावर आग्रही असून उडुपी जिल्ह्यातील कुंदापूरमधील एका महाविद्यालयात हिजाब घालून येणाऱ्या विद्यार्थींना स्वतंत्र वर्गात बसवण्या येईल, या निर्णयामुळे महाविद्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कर्नाटकात हिजाब प्रकरण चांगलचे तापले असून हिजाब घातलेल्या मुलींना वेगळ्या खोलीत बसण्यात सांगितले आहे. तसेच ज्यावेळी ते ठरलेल्या ड्रेसकोडमध्ये येतील तेव्हाच त्यांना वर्गात बसवण्याची परवानगी देण्यात येईल. हिजाब घालण्याचा हट्ट धरणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारी शैक्षिणक संस्थांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांनी सांगितले.
हिजाबला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांनी भगव्या शाली घालून विरोध दर्शवित आहेत. हिजाब घातलेल्या मुलींना वर्गात बसण्याची मुभा देण्यात आली, तर आम्ही या शाल घालून महाविदयालयात येऊ असे हिजाबला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांनाचे म्हणणे आहे. हिजाबच्या समर्थनार्थ दलित विद्यार्थ्यांनी निळ्या रंगाची शाल घालून समर्थन केले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सर्वाना शांतता पाळण्याचे आवाहन केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.