वानखेडेंच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली

वानखेडेंच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली

  राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिकांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. तसेच समीर वानखेडेंचे जातप्रमाणपत्र सादर करत ते मुस्लिम असल्याचा आरोप मलिकांनी केला. त्यामुळे ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिकांविरोधात मानहानीचा दावा दाखल केला. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या जातप्रमाणपत्रावर न्यायालयीन सुनावणी पुढे ढकलली आहे.

  ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिकांविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने २२ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे. या सुनावणीदरम्यान नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांनी कागदपत्रे सादर केली आहेत. तसेच न्यायालयाने ज्ञानदेव वानखेडे यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची नोंद घेत २२ नोव्हेंबरपर्यंत निर्णय राखून ठेवला आहे.

मलिकांचे आरोप

  नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर ट्विट करत अनेक आरोप केले आहेत. तसेच समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र सादर करत ते मुस्लिम असल्याचा आरोपही मलिकांनी केला आहे. बनावट कागदपत्रे दाखवून समीर वानखेडे शासकीय नोकरीला लागले असल्याचेही ते म्हणाले.

ज्ञानदेव वानखेडेंचा अब्रुनुकसानीचा दावा

  ज्ञानदेव वानखेडे यांनी दाव्यात म्हटले आहे की, ‘मलिक दररोज नवा आरोप करून आमची बदनामी करत आहेत. त्यामुळे आमच्या प्रतिमेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. आमच्या विरोधात अनेक पोस्ट केल्या जात असून आम्हाला अनेक धमक्याही येत आहेत. या सर्व गोष्टींचा आम्हाला त्रास होत आहे’ असे ज्ञानदेव वानखेडे यांनी केलेल्या दाव्यात म्हटले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version