सत्तासंघर्षावर बुधवारी सुनावणी

सत्तासंघर्षावर बुधवारी सुनावणी

राज्यातील सत्तासंघर्षावर सुरु असलेली सुनावणी मंगळवारची संपली असून त्यावर बुधवारी पुन्हा सुनावणी घेण्यात येणार आहे. मंगळवारी दिवसभर सुमारे चार तास या प्रकरणावर सुनावणी घेण्यात आली. त्यामध्ये ठाकरे गटाच्या वतीने युक्तीवाद करण्यात आला. आता यावर बुधवारी शिंदे गटाच्या वतीनं युक्तीवाद करण्यात येणार आहे.

उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा उपस्थित करताना अरुणाचल प्रदेशमध्ये २२ आमदारांचं निलंबन झालेला नबाम रेबिया प्रकरणाचा दाखला दिला. पण युक्तीवादादरम्यान, खंडपीठानं हे स्पष्ट केलं की, महाराष्ट्राचं आणि शिवसेनेचं भवितव्य या नबाम रेबिया प्रकरणावर ठरणार नाही. याबाबत सर्व तथ्ये तपासून आम्ही निर्णय देणार आहोत. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण हे नबाम रेबिया प्रकरणापेक्षा कसं वेगळं आहे, हे समजवून सांगण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आला. तर सिब्बल यांचे दावे शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांच्याकडून खोडून काढण्यात आले.

दरम्यान, आज पाच सदस्यीय घटनापाठीपुढे झालेल्या सुनावणीत शिवसेनेचे ( ठाकरे गट ) वकील कपिल सिब्बल, वकील अभिषेक मनु सिंघवी आणि वकील देवदत्त कामत यांनी युक्तीवाद केला आहे. तर, बुधवारी होणाऱ्या सुनावणीत शिंदे गटाचे वकील हरीश साळवे हे युक्तीवाद करणार आहे. शिंदे गटाकडून नबाम रेबिया प्रकरणाचा सातत्याने दाखला देण्यात येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version